
अपरिचित अमेरिका (Aparichit America)
लेखक - अनिल वाळिंबे
₹ 180.00
जागतिक महासत्ता, सर्वश्रेष्ठ लष्करी आणि आर्थिक ताकद अशी ओळख असणाऱ्या अमेरिकेबद्दल सर्वांनाच कुतूहल असते. टाईम स्क्वेअर, सेंट्रल पार्क, स्वातंत्र्य देवीचा पुतळा ही ठिकाणे जगप्रसिद्ध आहेत. पण याही व्यतिरिक्त अमेरिकेत अशी बरीच ठिकाणे आहेत जी पर्यटकांमध्ये अजूनही परिचित नाहीत. अशाच अनेक अपरिचित ठिकाणांच्या अपरिचित गोष्टी, परिचित शहरांचा अपरिचित आणि मनोरंजक इतिहास, तसेच अपरिचित लहान शहरे, त्यांचा विकास व ऱ्हास यांचा मनोरंजक पद्धतीने घेतलेला मागोवा म्हणजेच “अपरिचित अमेरिका”. या अपरिचित ठिकाणांबद्दल मराठीत लेखन तसे कमीच आढळते. अनिल वाळिंबे यांनी स्वतः या अपरिचित ठिकाणांची सफर करून, सोप्या भाषेत सिद्ध केलेले हे पुस्तक वाचकांना डोळस पर्यटन करण्यास नक्कीच उद्युक्त करेल…..