(Lekhsangrah)

लेखक -

पृष्ठे - 152

₹ 210.00

छत्रपती शिवाजी महाराज!! उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. या मनुष्याची भुरळ ही इतिहास अभ्यासकांना, वाचकांना, परदेशी प्रवाशांना सर्वांनाच पडली. छत्रपती शिवाजी महाराजांना जीवाला जीव देणारे अनेक सवंगडी लाभले. ‘लाख मेळा तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे” या उक्तीला जागून अनेकांनी स्वराज्यासाठी आणि राजांसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. बाजीप्रभू देशपांडे हे असेच एक नाव. हिरडस मावळातील बांदल देशमुखांच्या पदरी बाजीप्रभू यांचे घराणे देशपांडे म्हणून काम करत होते. जसे बांदल घराणे स्वराज्यात आले तसेच बाजीप्रभू सुद्धा राजांच्या पदरी काम करू लागले आणि अल्पावधीतच त्यांनी राजांचा विश्वास मिळवला. ‘साहेबास तुमच्यावर भरवसा आहे’ , असे शिवाजी महाराज बाजीप्रभूंनी लिहिलेल्या एका पात्रात म्हणतात. बाजीप्रभू यांचे नाव गाजले ते गजापूरची लढाईत, म्हणजेच अनेकांना माहिती असलेल्या पावनखिंडीच्या लढाईत. महाराज सुखरूप विशाळगडावर जावेत म्हणून गजापूरची घाटीत पाय रोवून बाजीप्रभूंनी बांदल सैन्याच्या समवेत आपल्या प्राणांचे बलिदान दिले. बाजीप्रभू आणि समस्त बांदल सैन्य यांच्या त्या पराक्रमाचा इतिहास सांगण्याचा हा प्रयत्न….. !

Scroll to Top